रिलायन्स ‘जिओ’ नेणार ९९ टक्के लोकांपर्यंत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

प्रतिमाह २४० कोटी जीबी डाटा वापर, अडीच कोटींकडे फोन
नव्या जिओ फोन २९९९ रुपयांना, २१ जुलैपासून मान्सून ऑफर

सरकारी बँकांचे भवितव्य चिंताजनक, विलिनी करणाचा सल्ला
आधार बायोमेट्रिक डाटानंतर डीएनए नमुन्यांसाठी विशेष बँक

 
रिलायन्स ‘जिओ’ ला देशातील ९९ टक्के लोकांपर्यंत नेण्याचे लक्ष्य कंपनीने ठरविले आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावात जिओ पोहोचविण्या साठी कंपनी प्रयत्नशील झाली आहे. दर महिन्यास सुमारे अडीचशे कोटी जीबी (गिगॅबाईट) डाटाचा वापर होऊ लागलेला आहे. रिलायन्स जिओकडे आज २२ कोटी ग्राहक आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून जिओचे फोन-२ बाजारात मिळण्यास प्रारंभ होणार आहे. नव्या जिओची किंमत २९९९ रुपये इतकी राहणार आहे. २१ जुलैपासून फोनच्या मान्सून ऑफर अंतर्गत जुने फोन बदलण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
 
या ऑफरनुसार जुना जिओ फोन देऊन नवा जिओ फोन घेता येणार आहे. जिओची कमाई १०० टक्के वाढीसह सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. शाळाशाळात व गावागावात जिओ ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतात २२ कोटी ग्राहकांकडून प्रतिमाह २४० जीबी डाटा वापरला जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(आरआयएल)ने जिओ फोन-२ लॉंच केला असून त्यात व्हॉट्स ऍप, फेसबुक, यु ट्युब आदींची सुविधाही आहे. याशिवाय जिओ गिगॅ राऊटर व जिओ टीव्ही सेट टॉप बॉक्स ही लांच करण्यात आली आहे. त्यात व्हाईस कमांड फीचरही अंतभूत आहे.
 
 
भारतात अडीच कोटी लोकांकडे जिओ फोन आहेत. कुठल्याही अतिरिक्त गुंतवणुकी विना जिओची क्षमता वाढविली जाणार आहे. कंपनीच्या योजनेनुसार स्वस्त दरात ब्रॉडबॅण्ड कनेक्शन उपलब्ध केले जाणार आहे. जिओ गिगॅ फायबर या नावाने फायबर ब्रॉडबॅण्ड लांच करण्यात आले आहे. फायबर कनेक्टिव्हिटीत अडीच लाख कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीज ही फिक्स्ड लाईन ब्रॉडबॅण्डमधील टॉप पाच कंपन्यात समाविष्ट होणार आहे.
 
 
जिओ गिगॅ फायबर देशातील ११०० शहरांमध्ये लॉंच होणार असून माय जिओ किंवा जिओ डॉटकॉम वर जिओ गिगॅ फायबर रजिस्ट्रेशन होऊ शकेल. जिओ गिगॅ फायबर सेवा एका तासाभरात उपलब्ध होईल. नव्या जिओ फोनची किंमत २९९९ रुपये राहणार आहे. या नव्या सेवा येत्या १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. १५ ऑगस्ट रोजीच जिओ फोन-२ बाजारात मिळण्यास प्रारंभ होईल.
 
 
कंपनीच्या योजनेनुसार लघु उद्योजकांसाठी कमाईचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. रिलायन्स रिटेलने यावर्षी ४००० नवे स्टोअर्स उघडले आहेत. या स्टोअर्समध्ये एका वर्षभरात पाच लाख टनांपेक्षाही जास्त किराणा माल विकण्यात आलेला आहे. लहान व्यापार्‍यांना वित्तीय सहाय्य देण्याचीही कंपनीची योजना आहे. रिलायन्स शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीपेक्षाही जास्त वाढविण्यास सज्ज आहे.
 
 
आरईएलकडे सर्वात मोठा करमणूक मंच (एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म) आहे. नेटवर्क १८ पाहणार्‍यां(व्हुअर्स)ची संख्या ७० कोटी म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षाही जास्त झालेली आहे. नेटवर्क १८ च्या डिजिटल, रिजनल कंटेंटवर अधिक भर दिला जात आहे. देशातील प्रत्येक दुसरी व्यक्ती नेटवर्क १८ च्या कंटेंटशी जोडलेली आहे. कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन ग्र्र्र्राहकांच्या गरजांची माहिती मिळू शकते.
 
 
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकां(पीएसयु बँका)चे भवितव्य चिंताजनक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या बँकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पीएसयु बॅकांचे एकमेकात विलिनीकरण करण्याचा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. सरकार बँकांना उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे दृष्टिने कार्य करीत आहे. या बँकांची लाखो कोटी रुपयांची कर्जे थकित असून काही बडे कर्जदार तर चक्क देशाबाहेर पळून गेले आहेत. या बुडित कर्जांमुळे पीएसयु बँकांच्या अनार्जित मालमत्तां(एनपीए)चे प्रमाण वाढत असून कर्जे निर्लेखित करणे बँकांना भाग पडत आहे.
 
 
शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणुकदार म्हणजे विदेशी गुंतवणूक संस्था (एफआयआय) व देशी गुंतवणूक संस्था (डीआयआय) हे होत. गेल्या काही दिवसांपासून एफआयआयकडून बँक, धातू व उर्जा क्षेत्रातील शेअर्सच्या मोठ्या प्रमाणावर विक्रीचा सपाटा सुरु झालेला असला तरी डीआयआय ची गुंतवणूक सातत्याने सुरु आहे. पण ते आता सतर्क राहून व्यवहार करीत आहेत.
 
 
जागतिक बाजारावरील गुंतवणुकदारांचा विश्वास घटत चाललेला असला तरी भारतीय बाजार मात्र गेल्या चार ते पाच वर्षात (केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात) मजबूत बनलेला आहे. औषधनिर्मिती(फार्मा) व माहिती तंत्रज्ञान (आयटी) या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी वाढत चाललेल्या आहेत. मिडकॅप शेअर्समध्ये चढउतार होत असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते चांगले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.आधारचा बायोमेट्रिक डाटा मिळविल्यानंतर सरकार आपले डीएनए नमुने गोळा करणार आहे. त्यासाठी डीएनए बँक स्थापन करण्यात येणार आहे. या डीएनए बँकेद्वारे मृतदेहांची ओळख पटविली जाणार असून गुन्हेगारी प्रकरणाच्या शोधात मदत होईल.
 
 
शेअर बाजारात पुन्हा मंदी, निर्देशांक घटले
आठवड्याच्या मध्यानंतर गुरुवारी अमेरिका-चीन व्यापारयुद्धा(ट्रेड वॉर) च्या ‘टांगत्या तलवारी’मुळे शेअर बाजारात पुन्हा मंदी अवतरली असून त्याचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक घटले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स)बुधवारच्या बंद ३५ हजार ६४५ बिंदूंवरुन आज सकाळी ३५ हजार ७०३ बिंदूंवर उघडत ३५ हजार ७४८ बिदूंच्या उच्च तर ३५ हजार ५१७ बिदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) बुधवारच्या बंद १० हजार ७६९ बिंदूंवरुन सकाळी १० हजार ७८६ बिंदूंवर उघडून १० हजार ७८६ बिंदूंच्याच वरच्या तर १० हजार ७२६ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ७० बिंदूंनी घटून ३५हजार ५७४ बिंदूंवर तर निफ्टी २० बिंदूंनी कमी होऊन १० हजार ७४९ बिंदूंवर बंद झाला. कच्च्या खनिज तेलाचा भाव ५१३६रुपये(सुमारे ७३ डॉलर्स) प्रतिपिंप एवढा झाला होता. तर सोनेदेखील १५ रुपयांनी घटून ३० हजार ५९९ रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे झाले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@