वरणगावला महामार्गावर पिकअप शेड होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

नगराध्यक्ष सुनील काळे यांचे प्रयत्न यशस्वी; बसस्थानकासाठी जागा देणार
नागरिकांना उभे राहण्यापासून दिलासा

वरणगाव :
राष्ट्रीय महामार्गावरील वरणगाव शहरात बस थांबा अथवा पिकअप शेड नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते. यामुळे वाढलेली अपघाताची भीती पाहता नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद मेढे यांनी २५ एप्रिलला विभागीय नियंत्रकांकडे किमान पिकअप शेड उभारावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार परिवहन महामंडळाच्या अभियंत्यांनी बुधवारी जागेची पाहणी केली.
 
 
शहरातील नागरिकांना भुसावळ किंवा मुक्ताईनगरकडे जाण्यासाठी पीकअप शेडअभावी महामार्गावर जीव मुठीत धरून उभे राहावे लागते. उन्हाळा किंवा पावसाळ्यात मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन बसची प्रतीक्षा करावी लागते. हा त्रास दूर करण्यासाठी शहरात बसस्थानक अथवा पिकअप शेड उभे करावे, अशी मागणी प्रलंबित होती.यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद मेढे यांनी २५ एप्रिलला जळगावचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी परिवहन विभागाचे अभियंता आर.व्ही.चव्हाण, शाखा अभियंता बी.एम.पठार, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मिलिंद मेढे आदींनी पिकअप शेडसाठी नियोजित जागेची पाहणी केली. लवकरच अंदाजपत्रक तयार होणार आहे.
 
परिवहन महामंडळाकडे जागा वर्ग करुन बसस्थानक
शहरात बोदवडकडे जाणार्‍या रस्त्यावर जुने बसस्थानक आहे. मात्र, हे स्थानक रहदारीसाठी अडथळा ठरते. त्याचा परिवहन मंडळाला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे हे बसस्थानक तोडून त्याठिकाणी पिकअप शेड उभारणीवर चर्चा झाली. दरम्यान, प्रवाशांची तात्पुरती सोय म्हणून पीकअप शेड उभारू. पालिकेची जागा महामंडळाकडे वर्ग करून आधुनिक सोयी-सुविधांचे बसस्थानक उभारणीचे प्रयत्न सुरु असल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@