भुसावळ विभागातील तीन रेल्वे स्थानकांवरील रेल्वे थांबे बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |
 
 
भुसावळ, ६ जुलै  :
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन रेल्वे स्थानकांवरील तिकीट विक्री नसल्याने या रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्या न थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून ११ जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
 
कोहदड, मांडुरा व शिराला या रेल्वे स्थानकांवर ११ जुलै पासून रेल्वे गाड्या थांबणे बंद होणार आहे. रेल्वेच्या उच्चस्तरिय अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत या रेल्वे स्थानकांवर तिकिट विक्री अल्प आहे तसेच प्रवाशांची संख्यासुध्दा अत्यल्प आहे. तसेच कोहदड रेल्वे स्थानक खंडवा रेल्वे स्थानकाच्याजवळ आहे. मांडुरा रेल्वे स्थानक मुर्तीजापूर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे तर शिराळा हे रेल्वेस्थानक चांदुरबाजार रेल्वे स्थानकाजवळ आहे. त्यामुळे या तीन्ही रेल्वे स्थानकांवर ११ जुलै पासून रेल्वे गाड्या थांबणार नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@