भूतानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |



 

नवी दिल्ली: डोकलाम येथे उद्भवलेल्या तणावानंतर भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंधांत तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही काळानंतर तणाव निवळल्यावर भारताने आपला जुना मित्र भूतानशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भूतानचे पंतप्रधान डॅशो त्शेरिंग त्बोगे भारत दौर्‍यावर आले आहेत. ते तीन दिवस भारतामध्ये विविध द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील.
 

भारतामध्ये आल्यावर त्यांचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी स्वागत केले. सिंग यांच्यानंतर भूतानच्या पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळेस दोन्ही देशांच्या नेत्यांबरोबर त्यांचे अधिकारीही उपस्थित होते.

 

डोकलामच्या प्रश्नानंतर भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवल यांनी भूतानला भेट दिली होती. त्यानंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि लष्करप्रमुख रावत यांनीही भूतानला भेट देऊन डोकलामसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. भूतान आणि भारत यांच्या संबंधांना ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भूतानच्या पंतप्रधानांची भारत भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येते.

@@AUTHORINFO_V1@@