उत्राण येथे मध्यरात्री हल्ला एकाचा खून तीन जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |

 
 
 

उत्राण येथे मध्यरात्री हल्ला एकाचा खून तीन जखमी

जळगाव, ५ जुलै
ऐरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गुरुवारी रात्री २.३० वाजेच्या सुमारास शेतातील कुटुंबावर जीव घेणा हल्ला होवून एकाचा खून झाला तर तीन जखमींपैकी बालकांची प्रकृती गंभीर आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुकलाल भिलाल मुळ रा.सेंधवा हा गेल्या ३ ते ४ वर्षांपासून उत्राण येथे सालदारकी करत आहे. त्याच्या सोबत त्याचे कुटुंब वास्तव्यास आहे.सुकलाल हा राजु पाटील यांच्या शेतात सालदारी करत असून शेतातच कुटुंबासह तो राहत होता. हे शेत गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. गुरुवारी रात्री २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती येवून त्यांनी हल्ला केला यात सुकलाल भिलाल हा ठार झाला आहे. तर मयत सुकलालची पत्नी पारु वय ३६ ही गंभीर जखमी आहे. सीमा (मुलगी )वय १२ ही सुध्दा जखमी आहे तर गोविंद (मुलगा ) वय ९ याची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर गोविंद याच्यावर अतिदक्षाता विभागात उपचार सुरु आहेत.
 
दरम्यान ज्ञानसिंग पावरा या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह घटनास्थळा पासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळांवर आढळून आला आहे. ज्ञानसिंग पावरा याने आत्महत्त्या केली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक  बच्छाव, उपअधीक्षक केशव पातोंड, सपोनि संदीप पाटील आदीनीं घटनास्थळ गाठून पाहणी केली.
@@AUTHORINFO_V1@@