मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |



पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगर आणि उपनगरामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसानंतर आता मान्सूनराजाने पुण्यात देखील आपली हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून शहरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे.

दरम्यान मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, पनवेल याठिकाणी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने देखील पुढील २४ तासांमध्ये शहरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर नेहमीप्रमाणे या मुसळधार पावसाचा परिणाम शहरातील रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिरा सुरु असून मध्य रेल्वेची वाहतुकी ही २० ते २५ मिनिटे उशिराने चालत आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांचा याचा मोठा त्रास होत आहे.


याचबरोबर सातारा, कोल्हापूर आणि कोकणात देखील पावसाने जोर धरला आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात कोयना धरणक्षेत्रात पावसाने आपला जोर धरला वाढवला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे. अगदी हीच परिस्थिती कोल्हापूर आणि कोकणामध्ये देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने आपल्या दमदार पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@