अमरनाथ यात्रा : बालटालनंतर पहलगाम मार्गही बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |

खराब वातावरणामुळे यात्रा स्थगित



पहलगाम (जम्मू-काश्मीर) : अमरनाथ यात्रेचा आजचा सहावा दिवस असून गेल्या सहा दिवसांमध्ये आज दुसऱ्यांदा पहलगाम येथील मार्ग भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे. पहलगाम आणि आसपासच्या भागामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या आठाड्यात देखील मुसळधार पावसामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता.


दरम्यान बालटाल येथील मार्गवर काल दरड कोसळल्यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. बालटालपासून काही अंतरावर घाटमार्गावर काल दरड कोसळली होती. यामध्ये एकूण पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच तीन जण जखमी झाले होते. यानंतर ही दरड स्वच्छ करेपर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर आज पहलगामचा मार्ग देखील बंद करण्यात आल्यामुळे भाविकांना अमरनाथ दर्शनासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग देखील घेणार दर्शन

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे कालपासून दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. राज्यामध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर राज्यातील सुरक्षा स्थितीचा तसेच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा ते घेणार आहेत. याचवेळी सिंग हे स्वतः अमरनाथ गुहेत जाऊन अमरनाथचे दर्शन घेणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@