आंबिवली रेल्वे स्थानकालगतच्या बोगद्याची दुरावस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |




टिटवाळा: आंबिवली रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ४८ नजीक असलेल्या बोगद्याची दुरावस्था झाली आहे. या बोगद्याला तडे गेले असून यावरून रेल्वे आणि बोगद्याखालून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे याची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

आंबिवली रेल्वे स्थानकानजीक असलेला हा भोगदा अतिशय गंभीर स्थितीत आहे. बोगद्यावरून रेल्वेची वाहतूक सुरु असते, तर खालून नागरिक आणि दुचाकी, तीनचाकी गाड्या ये जा करत असतात. दरम्यान, या बोगद्याला तडे गेले असून बोगद्या खालून गेलेल्या भूमीगत नाल्याला बोगघाच्या तोंडालगत मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी या बोगद्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

अंधेरी येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन जागृत झाले असले तरी आंबिवली रेल्वे गेट नं ४८ जवळील बोगद्याच्या गेलेल्या तड्यांमुळे या पुलांच्या स्ट्रक्‍चरल अँडीट व डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्लाच्या गड्यातून दररोज सुमारे ६ कोटी प्रवासी प्रवास करतात असून रेल्वेला लाईफलाईन असे म्हटले जाते. त्यामुळे जुन्या रेल्वे पुलाच्या तसेच रेल्वेमार्गांवरील जुन्या मोरीच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रश्नाबाबत रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. आंबिवली रेल्वे क्राँसिग गेट क्र ४८ जवळील बोगद्याला तडे गेल्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती आंबिवली रेल्वे स्थानकाचे सीएनसी अमेय कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@