जुहू चौपाटी वर पर्यटनासाठी गेलेले ५ जण बुडाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |

 
मुंबई :  कधी कधी पर्यटन देखील महाग पडतं, असाच काहीसा एक प्रसंग आज मुंबईच्या जुहू चौपाटी येथे घटला आहे. पर्यटनासाठी गेलेले ५ नागरिक बुडाले आहेत. यामुळे जुहू चौपाटीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पाच जण जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेले असताना बुडाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुडालेल्यांपैकी एकाला वाचवण्यात सुरक्षा रक्षकाला यश आले असून चौघांचा शोध सुरू आहे. सर्व तरुण अंधेरीतील डी. एन. नगरचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
फरदीन सौदागार (१७), सोहेल खान (१७), फैजल शेख (१७), नाझिर गाजी (१७), वसिम खान (१७) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यातील वसिम खान याला वाचवण्यात यश आले आहे. संध्याकाळी ५च्या दरम्यान गोदरेज चौपाटी तसेच गांधीग्राम चौपाटी येथे हा प्रकार घडला. या पाचपैकी वसीम यास सुरक्षारक्षकाने वाचवले. इतरांचा शोध सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@