झारखंड येथे ९ नक्षलवाद्यांचं समर्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |


 
 
लतेहार (झारखंड) :  झारखंड येथे आज ९ नक्षलवाद्यांनी समर्पण केले आहे. लतेहार पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी समर्पण केले असून आता ते मुख्यप्रवाहात येण्यास तयार झाले आहेत. या समर्पणादरम्यान त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये नक्षलवाद्यांच्या शिबिरामध्ये असलेल्या समस्या, वरीष्ठांनी दिलेली चुकीची वागणूक या सगळ्यासंबंधी त्यांनी यावेळी माहिती दिली आहे.
 
"नक्षलवादाचे काही नियम असतात, या नियमांचे पालन वरीष्ठ अधिकारी करत नाहीत, तसेच नक्षलवादी शिबिरांची परिस्थिती ठीक नाहीये, येथे मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, या कारणांनी आम्ही आत्म समर्पण करत आहोत." अशी माहिती या नक्षलवाद्यांनी दिली आहे.
सरकार किंवा इतर कुणाच्याही दबावाखाली न येऊन आपल्याच काही लोकांच्या वागणुकीला कंटाळून या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. सीआरपीएफच्या जवानांनी या लोकांचे स्वागत केले. पुष्पहार भेट देत सीआरपीएफ जवानांनी या समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे स्वागत केले आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यप्रवाहात येण्यासाठी त्यांना ५ लाख रुपये देखील देण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@