बुराडी आत्महत्याकांडासंबंधी सीसीटीव्ही फुटेज जारी, अनेक खुलासे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  दिल्लीच्या बुराडी येथे एकाच घरातील ११ लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित झाले असताना आज एक सीसीटीव्ही फुटेज जारी झाल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. या फुटेजमध्ये परिवारातील मोठी सून म्हणजेच मृत सविता आणि त्यांची मुलगी नीतू ६ काळे स्टूल घेऊन जाताना दिसून येत आहे. या स्टूल वर चढूनच या परिवाराने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 

पोलिसांची थिअरी :

पोलिसांनी मांडलेल्या थिअरीनुसार "या प्रकरणात बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा संबंध नाहिये. मृतांच्या गळ्याभोवती असलेल्या दोरीची गाठ आणि हे स्टूल असेच सांगतात की घरच्याच लोकांमुळे हा संपूर्ण परिवार नष्ट झाला आहे. परिवार एखाद्या अंधश्रद्धेवर आधारित पूजेत सहभागी होता. ज्यामध्ये परिवारातील धाकटा भाऊ म्हणजेल ललित याचा मोठा सहभाग आहे. घरातून ११ वह्या मिळाल्या आहेत ज्यानुसार ललित हे आपल्या मृत वडीलांशी संवाद साधू शकत होते आणि त्यांच्याच सांगण्यावरुन हे चालले होते. तसेच वहीत लिहिलेल्या मजकुरानुसार परिवाराला एका पेल्यात पाणी ठेवायला सांगण्यात आले होते, आणि पाण्याचा रंग बदलल्यावर आपले मृत वडील आपल्याला वाचवतील असा विश्वास ललित यांना होता." मात्र असे काहीच झाले नाही, उलट संपूर्ण परिवार मृत्युमुखी पडला.

 
१ जुलै रोजी दिल्लीच्या बुरारी भागात एका घरात ११ लोकांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यानंतर संपूर्ण भारत भरात खळबळ माजली. त्यानंतर घराची झडती घेतल्यावर अनेक धक्कादायक आणि रहस्यमयी गोष्टी समोर आल्या. यामध्ये घराच्या मागच्या बाजूला काढण्यात आलेले ११ पाईप्स आणि घरातून मिळालेल्या ११ वह्यांचा देखील समावेश आहे.
 
अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एक संपूर्ण परिवार नष्ट झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर उलट यामागे षडयंत्र आहे असे परिवारातील अन्य सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके काय घडले असेल हे पोलिस संपूर्ण तपासानंतरच सांगू शकतील, मात्र तूर्तास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात घरच्यांचाच हात आहे, आणि बाहेरील कुठलीही व्यक्ती यामध्ये सहभागी नाही असे स्पष्ट होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@