दारकुंडे दाम्पत्याने दाखल केले अर्ज,अनामत रुपातील सुटी नाणी मोजताना कर्मचारी हैराण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |
 
 
 

नामनिर्देशपत्रांना लागला मुहूर्त
दारकुंडे दाम्पत्याने दाखल केले अर्ज,
अनामत रुपातील सुटी नाणी मोजताना कर्मचारी हैराण

 
जळगाव, ५ जुलै
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल होण्यास शुक्रवारपासून (दि.६) सुरुवात झाली. भाजपाचे सदस्य नवनाथ व ज्योत्स्ना दारकुंडे यांनी प्रभाग क्रमांक २ (ब) मधून आपला अर्ज दाखल केला.त्यांनी प्रत्येकी अडीच हजार रुपयेप्रमाणे अनामत रकमेपोटी पाच हजार रुपयांची सुटी नाणी भरल्याने महापालिका कर्मचारी मात्र, ही नाणी मोजताना चांगलेच हैराण झाले.
 
 
महापालिका प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर प्रभाग क्रमांक १, २ व ३ साठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कक्ष आहेत.या कक्षात नवनाथ दारकुंडे व त्यांची पत्नी जोत्स्ना दारकुंडे यांनी पाच हजार रुपये अनामत रक्कम १ व २ रुपये नाण्यांच्या स्वरुपात भरली. या नाण्यांच्या पिशवीचे वजनच १४ किलो ४०० ग्रॅम होते. सिध्दार्थ दारकुंडे व दीपक जगताप यांनी नाण्यांची पिशवी महापालिकेत आणली.
 
अनातम रकमेपोटी सुटी नाणी आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कक्षांतील कर्मचार्‍यांची धांदल उडाली. नवनाथ दारकुंडे म्हणाले की, बर्‍याच दिवसांपासून निवडणूक खर्चासाठी एक व दोन रुपयांची सुटी नाणी जमा करीत होतो.
माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक २ (ड)साठी, पत्नी भारती कैलास सोनवणे व स्नुषा काजल जयदीप सोनवणे यांच्यासाठी ४ (ब) आणि मुलगा कल्पेश सोनवणे याच्यासाठी प्रभाग २ (ब) साठी अनामत रक्कम भरली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@