तळोद्याच्या तात्कालीन प्रकल्प अधिका­या विरुध्द 9 कोटी 7 लाखाच्या फसवणुकिचा गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |
 
 
 

तळोद्याच्या तात्कालीन प्रकल्प अधिका­या विरुध्द 9 कोटी 7 लाखाच्या फसवणुकिचा गुन्हा दाखल

तळोदा, 5 जुलै
विविध शासकिय योजनेखाली 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रुपये दिल्याचे भासवुन फसवणूक केल्या प्रकरणी गुलाबसींग एन वळवी तत्कालीन प्रकल्प अधिकारी याच्या विरुध्द बुधवारी दुपारी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
                  गुलाबसींग वळवी हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथे कार्यान्वीत असतांना 21 ऑगस्ट 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या कालखंडात , दुध उत्पादक कृषी सहकारी संस्था तळेादा, मंजुळाबाई दुध उत्पादक संस्था तळोदा, गोपाल दुध उत्पादक संस्था तळोदा, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन संस्था , आकाशदीप संस्था यासंस्थांच्या नावे विविध योजनेखाली रक्कम अदा केली आहे असे भासवुन शासकिय रकमेचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली. गुलाबसींग वळवी उपरोक्त कालखंडात कार्यरत असतांना अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्याना  दुधाळ म्हशी,गायी व शेळयांचे गट पुरवठा योजनेत गायीचे युनिट 1 कोटी 22 लाख 4 हजार रुपये, म्हशीचे युनिट 4 कोटी 9 लाख 60 हजार रुपये, आदिवासी शेतक-यांना पीव्हीसी पाईपचा पुरवठा करणे या योजनेत 2 कोटी 97 लाख 47 हजार 180 रुपये आणि लघु उपसा सिंचन व उपसा सिंचन योजने 7 लाख 80 हजार असा एकुण 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रुपयांचा अपहार केला.या बाबत निवृत्त न्यायाधीश एम.जी.गायकवाड , उच्च न्यायालय मुंबई समिती चौकशी अहवाल सुरु असल्याने अमोल मेतकर यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात गुलाबसींग वळवी यांच्या विरुध्द अपहार करुन फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.नि. मिलींद वाघमारे करित आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@