डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडे काढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |



मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ११६ झाडे काढावी लागणार असूल ही झाडे काढण्यासाठीच्या प्रस्तावाला आज वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत एक मताने मंजुरी दिली. दरम्यान, यापैकी ७९ झाडे कापावी लागणार आहेत तर, ३७ झाडे पुनरोर्पित करण्यात येणार आहे.

 

वीर सावरकर मार्गावरील युनायटेड मिल नं ६ , इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे असून स्मारकाच्या कामासाठी ही झाडे हटवावी लागणार आहेत. एमएमआरडीएने ही झाडे काढण्यासाठी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली होती. या प्रस्तावाला गुरुवारी वृक्षप्राधिकरण बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने परवानगी दिली असल्याची माहिती बाजार उद्यान अध्यक्ष हाजी हालीम खान यांनी दिली.

 

इंदू मिलच्या १६ एकर जागेपैकी ११ .४ एकर जागेवर स्मारक उभारले जाणार आहे. या जागेवर एकूण २५० विविध प्रकारची झाडे आहेत. यात आंबा, शेवगा, सोनमोहोर, फणस, गुलमोहोर, रामफळ, पिंपळ अशा झाडांचा समावेश आहे. त्यातील ११६ झाडे काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने ही जागा राज्य सरकारला हस्तांतरीत केली आहे. स्मारकाच्या उभारणीचे काम सुरु करण्यापूर्वी झाडे काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे.  पालिका प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार ही झाडे काढण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यात झोरू मथेना या व्यक्तीने सूचना नोंदवली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@