उपचाराभावी इसमाचा मृत्यूवैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत्यू झाल्याचा जि .प .सदस्य डॉ माने यांचा आरोप .

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |
 
 

उपचाराभावी इसमाचा मृत्यू
वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत्यू झाल्याचा जि .प .सदस्य डॉ माने यांचा आरोप .

पारोळा, ४ जुलै
पारोळा येथील कुटीर रुग्णालयात गेल्या १५ दिवसापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांना या बाबत जाब विचारला असता हे उडवा उडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. रुग्णाणसह कुटीर रुग्णालय हे वार्‍यावर असतांना लोकप्रतिनिधी झोपेत असल्याचा आरोप जि.प. सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांनी केला आहे.
 
 
डॉ.माने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व डी .डी. यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता कुटीर रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी चोरवड येथील अत्यावश्यक रुग्ण दगावला असल्याची विचारणा केली. त्याावरा दोघानी आम्हाला डॉक्टर निवडीचे अधिकार नाहीत अशा पद्धतीने टोलवाटोलवी करीत होते.
 
पारोळा तालुका हा महामार्गावर ३८ की मी च्या हद्दीत असून या जीवघेण्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असते. या परिसरात कुटीर रुग्णालय हे एकमेव असल्याने याठिकाणी अनेक डॉक्टर असणे गरजेचे आहे . ट्रामा केअर सेंटर चार वर्षांपासून बांधून पडले आहे त्याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टर नाहित,अनेक पदे रिक्त आहेत,याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत चौकशी करून योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने माजी आ. चिमणराव पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करून दोषींना जाब विचारला जाईल असा इशारा जि.प.सदस्य,उपजिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व पारोळा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@