शहरातील ४६९ मतदान केंद्रावर होणार मतदानप्रभाग ५ मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |
 
 
 
 

शहरातील ४६९ मतदान केंद्रावर होणार मतदान
प्रभाग ५ मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र

जळगाव, ४ जुलै
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून शहरातील १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ४६९ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ यासाठी मंगळवारी प्रभाग निहाय मतदान केंद्र व मतदारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे़ यात सर्वात लहान बुथ प्रभाग क्रमांक ६ मध्ये असून या बुथवर ४२० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत तर, सर्वांत जास्त मतदान केंद्र प्रभाग ५ मध्ये असून याच प्रभागात सर्वाधिक मतदान संख्या आहे़
मनपा निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी प्रभाग निहाय केंद्र जाहीर करण्यात आले असून यात सर्वांधिक म्हणजे ३४ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत़ तर, शहरातील सर्वांत कमी केंद्र प्रभाग १९ मध्ये म्हणजे १५ केंद्र स्थापन करण्यात येतील़ प्रभाग पाच मध्ये २७ हजार २१६ इतकी मतदार संख्या असून प्रभाग १९ मध्ये ११ हजार ५३४ एवढी मतदार संख्या आहे़ त्यामुळे मतदार संख्येनुसार मंगळवारी केंद्र जाहीर करण्यात आले असून यात काही केंद्र उपद्रवी असल्याने या ठिकाणी अतिरीक्त पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे़
प्रभाग निहाय केंद्र व मतदार
प्रभाग १-२३-१८१९४
प्रभाग २-२७-२०७९९
प्रभाग ३-२५-१९६७२
प्रभाग ४-३२-२४७६२
प्रभाग ५-३४-२७२१६
प्रभाग ६-२४-१८४९४
प्रभाग ७-२५-१९५२९
प्रभाग ८-२५-१९८२८
प्रभाग ९-२१-१६०८२
प्रभाग १०-२५-१९६८७
प्रभाग ११-२९-२२६५७
प्रभाग १२-२६-१८६०५
प्रभाग १३-२३-१७८९६
प्रभाग १४-२६-२०४८७
प्रभाग १५-२०-१६१४१
प्रभाग १६-२६-२०१९०
प्रभाग १७-२२-१७०२०
प्रभाग १८-२१-१६२७९
प्रभाग १९-१५-११५३४
 
@@AUTHORINFO_V1@@