आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांना देखील प्रसूती रजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारचा निर्णय 



मुंबई : राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना देखील यापुढे प्रसूतीसाठी पगारी रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापुढे राज्य सरकारमधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीसाठी म्हणून १८० दिवसांची पगारी रजा मिळणार असून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.


याचबरोबर महिलांबरोबर पुरुषांच्या रजेसंबंधी देखील मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार प्रसूती दरम्यान जर कोण्या पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नीचे निधन झाल्यास, बालकाच्या पालनपोषणासाठी म्हणून त्या पुरुष कर्मचाऱ्यास देखील १८० दिवसांची पगारी रजा देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली आहे.


दरम्यान हे दोन्ही निर्णय हे राज्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून लवकरच सरकार या दोन्ही निर्णयांसंबंधीचे परिपत्रक जारी करणार असल्याचे देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकार हे सातत्याने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत असून हे नवे निर्णय देखील लवकरच राज्यात लागू केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@