टी-२० मालिकेमध्ये भारताच्या पहिला विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

इंग्लंडवर ८ गडी राखून दणदणीत विजय

लोकेश राहुलची नाबाद शतकी खेळी



मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंड संघाने २० षटकांमध्ये दिलेले ८ बाद १६० धावांचे आव्हान भारतीय संघाने ८ गडी राखून अवघ्या १८.२ षटकांमध्येच पूर्ण केले आहे. या विजयासह या मालिकेमध्ये भारतीय संघाने १-० अशा गुणांनी आघाडी घेतली आहे.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर हा सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातीस भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मैदानात आलेल्या इंग्लंड संघाकडू जेसन रॉय (३०), जोस बट्लर (६९) आणि डेविड विली (२९) हे तीन खेळाडू वगळता एकालाही उत्तम कामगिरी करता आली नाही. या तिघांच्या बळावर इंग्लंड संघाने २० षटकांमध्ये १५९ धावांची मजल मारली होती. या बदल्यात भारताकडून कुलदीप यादव याने एकट्याने ४ षटकांमध्ये २४ धावांचा बदल्यात इंग्लंडचे ५ बळी घेतले. कुलदीप पाठोपाठ उमेश यादव याने २ तर हार्दिक पंड्या याने १ बळी घेतला.

यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये खेळाला सुरुवात केली. भारताच्या लोकेश राहुल याने १०१ धावांचं नाबाद शतकी खेळी केली. त्याला रोहित शर्मा (३२) आणि विराट कोहली (नाबाद २०) या दोघांनी उत्तम साथ देत, इंग्लंडने दिलेले आव्हान १८.२ षटकांमध्येच पूर्ण केले.

@@AUTHORINFO_V1@@