धक्कादायक; अलिबाग येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 


रायगड : दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच रायगड जिल्‍ह्यातील अलिबाग येथील आक्षी गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. यातील पाचही जणांनी कोल्ड्रिंक्समधून विष घेतल्याची माहिती असून पाचही जणांना उपचारासाठी अलिबागच्‍या जिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

 

घरातील कमावता मुलगा नोकरीनिमित्‍त मुंबईला असतो. त्याच्या पाठीमागे त्याची बायको, आई-वडील व दीड वर्षांची दोन जुळी मुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या सर्वांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

कारण अद्याप अस्‍पष्‍ट

 

कमावता मुलगा मुंबईला असताना एकाच वेळी कुंटुंबातील इतरांनी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न का केला? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. नेमका हा घातपात आहे कि आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@