मतदान प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच चेक पोस्टवर पथकाची नजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |
 
 

मतदान प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच चेक पोस्टवर पथकाची नजर

जळगाव ,४ जुलै
जळगाव महानगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेत दारु व पैसे वाटपाचा प्रकार होऊ नये म्हणून शहराबाहेरील मुख्य रस्त्यावरील पाच चेक पोस्टवर पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे़ या पथकात महसूल, पोलीस व टॅक्स विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग राहणार असून त्यांच्यासोबत एक व्हिडीओग्राफरदेखील नियुक्त राहणार आहे़ या पथकामार्फत शहरात येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात येणार असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले़ याबाबत मंगळवारी आयुक्त यांच्या दालनात बैठक घेण्यात आली़ या बैठकीला अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते़
मतदान प्रक्रियेत दारु व पैसे वाटपाचा प्रकार मोठ्याप्रमाणावर घडत असून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुख्य पाच पथके व तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे़ .गरज भासल्यास भरारी पथकांची वाढ करण्यात येणार आहे़ या संदर्भात पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली असल्याचे डांगे यांनी सांगितले़ तसेच मनपाच्या मुख्य प्रवेशद्वार, इमारतीचा पोर्च, मनपाचा पहिला मजला, तीसरा व १२ वा मजल्यावरदेखील पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे़ ४ जुलैपासून हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ उमेदवारांनी अर्ज भरण्याकरीता येतांना शक्ती प्रदर्शन किंवा रॅली काढतांना मनपाच्या गेट बाहेरच हा जमाव थांबवावा व अर्जसादर करतांना पाच किंवा सहाच लोकांनी मध्ये प्रवेश करावा, असे आवाहनही मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@