जमावाकडून होणाऱ्या हत्या थांबवा : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

राज्य सरकारांना कठोर कारवाई करण्याचे आदेश





नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हत्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. जमावाकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए.एम. खानविलकर आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यी खंडपीठाने यावर सुनावणी केली. देशामध्ये जमावाकडून होत असलेल्या हिंसाचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. देशातील कोणत्याही भागातील नागरिकांनी कसल्याही प्रकारची अफवा अथवा संशयाला बळी पडून कायदा हातात घेऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी तातडीने कारवाई करून यावर कठोर पावले उचलावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या रविवारी धुळ्यातील राईनपाडा येथे 'मुले पळवणारी टोळी' समजून फक्त संशयाच्या बळावर ग्रामस्थांनी पाच नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. कसल्याही प्रकारची चौकशी न करता, ग्रामस्थांनी कायदा हातात घेतल्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उठले होते. दरम्यान अशाच प्रकारच्या घटना याअगोदर युपी आणि बिहारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या या निर्देशांवर राज्य सरकारांनी तत्काळ अंमलबजावणी केली पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@