राईनपाडा घटनेसंदर्भात भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

घटनेचा तीव्र निषेध, दुदैवी पाच जणांची कुटुंबे उद्धवस्त झाल्याची खंत
समाजकंटकांना कठोर शिक्षेची मागणी

 
 
धुळे, ४ जुलै :
दिनांक १जुलै २०१८ रोजी राईनपाडा तालुका साक्री येथे भटक्या विमुक्त जाती- जमाती तील नाथ पंथी डवरी गोसावी जातीच्या पाच भिक्षेकरींना मुलं पळविणारी टोळी समजून गावकर्‍यांनी दगड काठ्यांनी ठेचून अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली. या घटनेचा भटके विमुक्त विकास परिषद व अखिल भारतीय नाथजोगी समाज यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध केला असून भविष्य काळात अशा घटना घडू नये यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
 
 
ज्या समाज कंटकांनी निर्घृणपणाने ही हत्या केली त्यांना शासनाने अतिशय कठोर शिक्षा मिळण्याची कार्यवाही करावी, महाराष्ट्र राज्यात आजही भटक्या विमुक्तांना पोट भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागते. भिक्षा मागावी लागते. स्वातंत्र्य मिळून साठ सत्तर वर्ष झाली तरीही भटक्यांची भटकंती थांबली नाही. शासनाने भटक्यासाठीं जर पर्यायी उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध करून दिले असते तर आज दुर्दैवी पाच कुटुंबे उध्वस्त झाली नसती अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
तसेच या घटनेतील दोषींवर कायद्याने कठोर शिक्षा करावी, खटला जलद न्यायालयात चालवावा, शासनाने घोषित केलेली आर्थिक मदत ताबडतोब मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावी, भटके जाती जमातीच्या लोकांना आधार कार्ड देऊन ओळखपत्रे द्यावी, या कृत्यात सहभागी नराधम तसेेच सोशल मीडियावर अफवा पसरवणारे दोषी असून त्यांच्यावरही कडक कार्यवाही करण्यात यावी, भटक्या विमुक्तांची भटकंती थांबविण्यासाठी त्यांना उत्पन्नाची साधने उपलब्ध करून द्यावीत, मृत व्यक्तीच्या कुटुंबियातील एकास सरकारी नोकरी ताबडतोब देण्यात यावी यासह अनेक अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. यावेळी भटक्या विमुक्त जातीचे विविध समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
 
 
भटक्या विमुक्त विकास परिषदेचे उपाध्यक्ष : उद्धव काळे, अखिल भारतीय नाथजोगी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मनेले, दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष डॉ. ए. डी.गोस्वामी, बंजारा समाजाचे प्रा. एस. के. राठोड, प्रा.डॉ एस.के. जोगी, रवींद्र बावणे, सौ शीतल जोगी (सरपंच सुलवाडी), जितेंद्र पंजे, सुनिल पंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@