निष्पक्ष सरकार आले तरच भारतात परतणार : झाकिर नाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

 
 
"भारतात आताचे सरकार निष्पक्ष नाही, जो पर्यंत भारतात निष्पक्ष सरकार निवडून येत नाही, तो पर्यंत मी भारतात परतणार नाही." असे वक्तव्य चिथावणीखोर भाषण करणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईक याने केले आहे. आपण भारतात येणार असल्याच्या माहितीचे खंडन करत त्याने हे वक्तव्य केले आहे. एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.
 
भारतात सुरक्षित वाटत नाही :
 
भारतात आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचे सांगून आतातरी भारतात परणार नाही असं झाकिर नाईकनं सांगितलं आहे. झाकीर नाईक इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक असून त्याच्या वादग्रस्त, चिथावणीखोर भाषणांमुळे २०१६मध्ये वाद निर्माण झाला होता, ज्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (Ed) या संस्थांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 
बांगलादेशामधील ढाका येथे १ जुलै २०१६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांना डॉ. झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित करणे, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, प्रक्षोभक भाषणे करणे आदी गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@