भूखंड घोटाळ्या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण आणि निरुपम यांना नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |

कॉंग्रेसने बिनबुडाचे आरोप केल्याचा भाजप आमदार लाड यांचा दावा




मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून लाड यांनी चव्हाण आणि निरुपम यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. चव्हाण आणि निरुपम यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले असून याविरोधात आपण अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील लाड यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मुंबई विमानतळाजवळील धरणग्रस्तांसाठी राखीव असलेल्या १७०० कोटी रुपयांच्या भूखंडाचा घोटाळा केल्याचा आरोप कॉंग्रेसने लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल पत्रकार परिषदेआमध्ये केला होता. खरे पाहता विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर धरणग्रस्तांचा अधिकार असताना देखील लाड यांच्या मदतीने ही जमीन काही खाजगी बिल्डर्सच्या घशात घालण्यात आल्याचे कॉंग्रेसने पुराव्यासह म्हटले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावत याला कॉंग्रेसचा बालिशपणा म्हणून घोषित केले. परंतु विरोधकांनी मात्र हा मुद्दा उचलत राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.


लाड यांनी देखील हे सर्व आरोप फेटाळून लावत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. यासाठी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा घेण्याचे देखील ठरवले आहे. कॉंग्रेस हे फक्त राजकीय द्वेषापोटी असे खोटे आरोप करत असून याला कायदेशीररित्याच उत्तर देऊन असे लाड यांनी म्हटले आहे. लाड यांच्या या वक्तव्यावर संजय निरुपम यांनी लाड यांच्यासह राज्य सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उद्या पुन्हा एकदा पुराव्यासह जनतेसमोर मांडू, असे निरुपम यांनी म्हटले आहे. त्यामुळे या भूखंड घोटाळ्याचे पुढे काय होणार ? हे पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@