मोदींनी दिल्या इम्रान खानला शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणुकांमधील विजयसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी फोनवरून इम्रान खान यांच्याशी संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या असून तेहरिक-ए-इन्साफच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये लोकशाही अधिक मजबूत होईल, असे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

काल रात्री पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी खान यांना त्यांच्या निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या व तेहरिक-ए-इन्साफ विजय हा पाकिस्तानमध्ये रुजू पाहणाऱ्या लोकशाहीचे प्रतिक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच तेहरिक-ए-इन्साफच्या या विजयामुळे पाकिस्तानमध्ये लोकशाही अधिक मजबूत होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टला इम्रान खान हे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@