करुणानिधी यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 
 
 
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे अध्यक्ष डॉ. एम. करुणानिधी यांचा चेन्नईतील कावेरी रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन् सेल्वाराज यांनी आज संध्याकाळी साडेसहा वाजता करुणानिधी यांच्या आरोग्यासंबंधी एका प्रसिद्धी पत्रक जारी केले. करुणानिधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मात्र त्यांनी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
 
 
करुणानिधी यांनी २८ जुलै रोजी रक्तदाब कमी झाल्यामुळे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र २९ जुलैला त्यांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे तब्येत आणखी खालावली होती. मात्र त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आता प्रकृती सुधारत आहे. मात्र त्यांचे वय व अन्य बाबी पाहता त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच ठेवणार असल्याचे रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
 
गेल्या चार दिवसांपासून एम्. करुणानिधी यांच्या तब्येतीमुळे राज्यभरातून त्यांचे लाखो चाहते चेन्नईतील कावेरी रुग्णालयाबाहेर उभे आहेत. करुणानिधी यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभारात विविध ठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करणारे ट्वीट केले होते. तसेच उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांच्यासह देशभरातील विविध राजकीय नेते कावेरी रुग्णालयात येऊन करुणानिधी यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. कांँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी देखील आज करुणानिधी यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@