कुडूस गावाचा चेहरामोहरा बदलविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |



वाडा: तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत ही सर्वात श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच युवा कार्यकर्ते डॉ. गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चौधरी यांनी गावातील प्रलंबित असलेली विकासकामे येत्या तीन वर्षांच्या कालावधीत मार्गी लावून कुडूसचा चेहरामोहरा बदलविणार असल्याची माहिती दिली.

 

गावासाठी पाणीयोजनेचे काम सुरू असून जलशुद्धीकरण यंत्रासाठी जागेचा प्रश्न असून येथील एका व्यक्तीबरोबर जागेसंदर्भात बोलणी सुरू असून जागेचा प्रश्न लवकरच निकाली निघून येत्या काही महिन्यात पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा मानसही उपसरपंचांनी बोलून दाखवला आहे. स्मशानभूमीच्या विषयावर बोलताना त्यांनी डावजई तलावाजवळ ग्रामपंचायतीच्या मालकीची २० गुंठे जागा असून त्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी स्मशानभूमी बांधण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. संपूर्ण कुडूस गावाला वायफाय सेवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच गावातील भुरट्या चोरट्यांवर पायबंद बसावा, यासाठी सीसीटीव्हीने जोडण्यात येणार आहेत.

 

येत्या तीन वर्षांच्या कालावधीत मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाने तर अंतर्गत रस्ते पेव्हरब्लॉकने करण्यात येतील. काही योजनांसाठी ग्रामपंचायत निधी तर काही निधी उद्योजकांकडून घेऊन ही विकासकामे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

@@AUTHORINFO_V1@@