शिवसेनेची विराट प्रचार रॅली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

शिवसेना विजयी घोडदौड कायम ठेवणार..

 
 
जळगाव :
शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज सुरेशदादांच्या मार्गदर्शनात शिवसेनेची विराट रॅली जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी या रॅलीला शहराच्या शाश्वत विकासासाठी हाती सत्ता देण्यासंदर्भात सुरेशदादा व राज्याचे सहकार राज्यमंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी संबोधित केले. यावेळी मा. आ. चंद्रकांत सोनवणे, मा. आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आ. आर. ओ. तात्या पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शाम कोगटा,राजेश जैन, गजानन मालपुरे, ह. भ. प. जळकेकर महाराज, राजू मोरे, आर. पी. आय. चे अनिल अडकमोल, महानंदाताई पाटील, जयश्री पाटील, भारती जाधव, वर्षा खडके, राखी सोनवणे, मंगला बारी यांसह शिवसेनेचे सर्व उमेदवार, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शिवसैनिक युवावर्ग, महिला, पुरूष उपस्थित होते.
 
 
आज शहरात शिवसेनेच्या वतीने विराट प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून शिवसेना संपर्क कार्यालयापासून विराट रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर नेहरू चौक, फुले मार्केट, सुभाष चौक, चित्रा चौकमार्गे भव्य रॅली पार पडून छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या रॅलीची सांगता झाली. या विराट रॅलीत ढोल-ताशांच्या गजरात, जागोजागी सुरेशदादांचे पुष्पहार, विजयी माळा गळ्यात घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या जिवाभावाच्या दादांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उसळला होता. सर्व जाती-धर्माचे नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. सर्वत्र भगवे ध्वज फडकत होते तर जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी सर्व परिसर शिवसेनामय झाला होता.
 
 
शिवाजी चौक येथे मा. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पैशांच्या बळावर विजय मिळवणे या विरोधकांच्या मूळ रणनीतीचा खरपूस समाचार घेतला. जनतेला संबोधित करताना शहराला सुंदर बनविण्याचे स्वप्न बघून उभे आयुष्य कठोर परिश्रम घेणार्‍या सुरेशदादांनी शहराच्या जनतेला विकासात अडथळा आणणार्‍या विरोधकांची कपटनीती ओळखून शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले.
 
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून ४०० कोटींचा निधी आणणारच- सुरेशदादा जैन
यावेळी सुरेशदादा म्हणाले की, जनता जनार्दनाने आजपर्यंत माझ्यावर विश्वास दाखविला तो कायम ठेवावा. सत्तेवर आल्यानंतर सुंदर शहर घडविण्यासाठी सरकारकडून ४०० कोटींचा निधी आणल्याशिवाय राहणार नाही, अन्यथा हा निधी आम्ही उभारू.
 
 
शिवसैनिकांना विरोधक पैशांच्या बळावर विकत घेऊ शकणार नाही- गुलाबराव पाटील
विरोधकांचा भ्रष्टाचारातून मिळवलेला जनतेचा पैसा विकासकामासाठी न वापरता त्याच पैशांच्या बळावर जनतेची मते मिळविण्यावर भर असतो. पण स्वाभिमानी शिवसैनिकांना ते विकत घेऊ शकत नाही. महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल.
 
*  हमाल मापाड्यांनी ते शहरातील नागरिकांनी, व्यापार्‍यांनी दादांचे केले स्वागत.
* प्रत्येक वॉर्डात महिलांनी दादांचे औक्षण करून स्वागत केले.
* आजच्या रॅलीत सुरेशदादांचे चिरंजीव राजेश जैन, दोन पिढ्यांनी केला शिवसेनेचा प्रचार
@@AUTHORINFO_V1@@