‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई :  पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ४  वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
पुराभिलेख संचालनालयात सन १६३० पासूनचे दुर्मिळ अभिलेख जतन करण्यात आले असून यामध्ये मराठी, मोडी, इंग्रजी, पर्शियन आणि उर्दू अभिलेखांचा समावेश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रेरणादायी कामाची महती आजच्या युगात आपणाला अनुभवायची असेल तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असणारी कागदपत्रे यांचाही समावेश आहे. महत्त्वाची कागदपत्रे, निवडक भाषणे हे सर्व ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या प्रकाशनातून प्रकाशित करण्यात येत आहे.
 
 
 
या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@