दुर्गम पाड्यांमध्ये मोटर बाईक रुग्णवाहिका सुरू होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 

 

मुंबई : पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांमध्ये गुरूवारपासून मोटर बाईक रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी दिली. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा मिळावी, तसेच कुपोषित बालके, गरोदर मातांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळण्यासाठी ही सुविधा गुरूवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 

पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी मुंबईत १० मोटर बाईक रुग्णवाहिकाची सेवा सुरू करण्यात आली होती. त्या सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यात नव्याने ३० अशा रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय डॉ. दीपक सावंत यांनी घेतला होता. या अंतर्गत मे महिन्यात १० रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या. तसेच मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच बाईक रुग्णवाहिका सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालघर येथे दि. २ ऑगस्टपासून बाईक रुग्णवाहिकाची सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन मोबाईल मेडिकल युनिटदेखील सुरु केले जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

@@AUTHORINFO_V1@@