उद्यापासून दुध पाच रुपयाने महाग होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |



मुंबई : दुधाला लिटरमागे २५ रुपये दर (म्हणजेच लिटर मागे अधिकचे ५ रुपये) देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून होणार आहे. संध्याकाळपर्यंत याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात येणार आहे. नागपूर पावसाळी अधिवेशनात २१ जुलैपासून अंमलबजवणीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र खाजगी, तसंच शासनाच्या दूध सहकारी संस्थांनी अंमलबजावणीसाठी तांत्रिक कारणामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. ही वेळ वाढवून दिल्यामुळे अंमलबजावणीला उशीर झाला.

 

दुग्धविकास विभाग आणि संबंधित दूध संघांची आज बैठक झाली. यावर चर्चा करण्यात आली आणि उद्यापासून अंमलबजावणीचा निर्णय झाला. आज संध्याकाळपर्यंत शासन निर्णय जारी करून उद्यापासून अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात दूधदरवाढीसाठी राज्यात मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने दुधाला लिटरमागे पाच रुपये वाढवून देण्याची मागणी मान्य केली. २१ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्याची घोषणाही केली. मात्र तांत्रिक कारणांमुळे यासाठी उशीर झाला. अखेर शेतकर्‍यांना उद्यापासून दुधाला अधिकचा दर मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@