विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रकरणावर आज लंडनमधील न्यायालयात सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
लंडन : लंडनमधील न्यायालयात मद्य सम्राट विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. कित्येक कोटी रुपयांचा बँकेला चुना लावणाऱ्या मेहुल चोकसी याला देखील एन्टीगुआ येथून अटक करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. विजय मल्ल्या आणि मेहुल चोकसी या दोघांना गेल्या कित्येक महिन्यांपासून भारत सरकार शोधत आहे, शेवटी त्यांच्यावर इंटरपोलकडून ‘रेट कॉर्नर नोटीस’ जाहीर करण्यात आली आहे. 
 
 
विजय मल्ल्या याने बँकांचे कर्ज तर बुडविले आहे. मात्र यावर भारतीय सरकारने जी कारवाई केली त्याला देखील अमाप पैसा वाया गेला आहे. त्यामुळे विजय मल्ल्या याने आपल्या कर्जाची भरपाई तर करावीच मात्र पहिल्यांदा भारतीय सरकारला या कारवाईसाठी जो पैसा खर्च करावा लागला याची भरपाई आधी विजय मल्ल्या याने करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे. 
 
 
आधीच सार्वजनिक बँकांचे नऊ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज विजय मल्ल्या याच्याकडे थकीत आहे. यासाठी मल्ल्याकडून ७०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी त्याच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात खरेदीदारांना बर्‍याच वस्तू उपलब्ध झाल्या असून, त्यामध्ये विमातळाजवळ असलेले किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्यालय, अनेक कार, कार्यालयातील फर्निचर, बाथरोबसह अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले विजय मल्ल्यांचे खाजगी जेट, मल्ल्यांनी अनेक पार्ट्या आयोजित केलेले गोव्यातील किंगफिशर व्हिला आणि ‘फ्लाय वुईथ गुड टाईम्स’ या घोषवाक्यासह अनेक ब्रॅण्ड्स व ट्रेडमार्क्सचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@