निमा निवडणुकीत बॅनर्जी-खरोटे गटाकडे ११ जागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 

नाशिक : निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी बॅनर्जी-खरोटे गटाने कार्यकारिणीच्या २० पैकी ११ जागा जिंकल्या. यापूर्वी ७ जागा बिनविरोध त्यांच्या पदरात पडलेल्या असल्यामुळे ४१ पैकी १८ जागा जिंकत त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाची निवडणूक रविवारी पार पडली. ३३ जागांसाठी २९६५ मतदारांपैकी १७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत एकूण ६० टक्के मतदानाची नोंद केली होती.
 

मतदान प्रक्रियेप्रमाणेच मतमोजणी प्रक्रियादेखील क्लिष्ट असल्यामुळे मतमोजणीला विलंब होणार होताच. मात्र सुरुवातीलाच मतमोजणीसाठी विरोध दर्शविण्यात आल्याने काहीकाळ मतमोजणी थांबली. अखेर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कठोर भूमिकेने मतमोजणी सुरू करण्यात आली. दुपारी १ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री ९ .३० पर्यंत कार्यकारिणीच्या मतांची मोजणीच सुरू होती.

 

रात्री मतमोजणीनंतर प्राप्त माहितीनुसार एकता पॅनल (बॅनर्जी-खरोटे गट) चे तब्बल ११ उमेदवार, उद्योग विकासचे ७ तर एकता पॅनल (राठी-नहार गट)चे २ उमेदवार मतांच्या अग्रक्रमाने पहिल्या २० जणांत येऊन विजयी झाले. मतपत्रिकेचा आकार व ५६ उमेदवारांमुळे मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यासह मतमोजणीस तब्बल साडेआठ तास लागले. निमाच्या इतिहासात प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक रंगल्याने तिच्याकडे जिल्ह्याभरातील औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागून होते.

 

अध्यक्षपदी बॅनर्जी विजयी

रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार अध्यक्षपदी हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले. त्यांनी के. एल. राठी यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी उद्योग विकासचे शशिकांत जाधव, सरचिटणीसपदी तुषार चव्हाण, सचिवपदी सुधाकर देशमुख तर खजिनदारपदी कैलास आहिरे विजयी झाले.

विजयी सदस्य

 

एकता पॅनल (बॅनर्जी-खरोटे) : श्रीकांत बच्छाव, हर्षद ब्राह्मणकर, तेजपाल बोरा, गौरव धारकर, राजेश गडाख, करणसिंग पाटील, उदय रकिबे, अखिल राठी, भाग्यश्री शिर्के, संदीप सोनार, भरत येवला.

एकता पॅनल (राठी-नहार) नीलिमा पाटील, निखिल पांचाळ

कास पॅनल

संजय महाजन, एन.डी.ठाकरे, कमलेश नारंग, प्रदीप पेशकार, राजेंद्र जाधव, कैलास आहिरे, भाऊसाहेब रकिबे.

@@AUTHORINFO_V1@@