आश्रमात राहणाऱ्या महिला आणि मुलांना मदत करा : मनेका गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : आश्रमात वास्तव्य करणाऱ्या महिला आणि मुलांना सामान्य नागरिकांनी मदत करायला हवी अशी विनंती महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी नागरिकांना केली आहे. आपण सगळे समाजात राहतो त्यामुळे समाजाला आपले काही देणे आहे त्यामुळे आपण अनाथ मुलांची आणि आश्रमात राहत असणाऱ्या मुलांची आणि महिलांची मदत करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
यासाठी सरकारने मदत क्रमांक आणि इमेल संकेतस्थळ जाहीर केले आहे. या माध्यमातून सामान्य नागरिक अशा लोकांना मदत करू शकतात तसेच त्यांना काही मदतीच्या वस्तू आणि खाण्याचे अथवा काही महत्वाच्या वस्तू पाठवू शकतात अशी माहिती मनेका गांधी यांनी यावेळी दिली. आपल्या भारतात कित्येक आश्रम आहे त्यातील आपल्या घराजवळील अथवा आपल्या माहितीतील आश्रमात आपण दान अथवा त्यांना मदत करू शकतो असे देखील यावेळी मनेका गांधी यांनी सुचविले आहे.
 
 
 
मुलांची तस्करी आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण आपल्या समाजातील महिलांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. यासाठी आपणच पुढाकार घेवून यावर उपाय तसेच मार्ग काढायला हवा असे सांगण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@