मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

 
 
मतदानासाठी मिळणार  भरपगारी सुटी
जळगाव, ३० जुलै
जळगाव महानगरपालिकेच्या १ ऑगस्ट २०१८ रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी कळविले आहे.
 
 
मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या आस्थापनांनी कामागारांना या दिवशी सुटी अथवा मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ झेडए अन्वये राज्य निवडणूक आयोगावर महानगरपालिकांच्या / जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे. मुंबई प्रतीक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १४ (४) मधील तरतुदीनुसार निवडणुका शांत, मुक्त व निर्भय वातावरणात घेण्याकरिता निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी अथवा कामाच्या तासांमधून मतदान करण्याकरिता दोन तासांची सवलत देण्याबाबत योग्य ते निर्देश सर्व संबंधितांना तत्काळ देण्याबाबत संदर्भाधिन पत्रान्वये राज्य निवडणूक आयोग यांनी कळवलेले आहे.
 
दोन तासांची सवलत कुणाला लागू?
मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील, उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम/अखंडित उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी.
 
@@AUTHORINFO_V1@@