विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

सप्टेंबरमध्ये ब्राझीलला होणार रवाना

 
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ५ खेळाडूंची निवड भारतीय विद्यापीठ संघात झाली आहे. के आय आय टी विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्या वतीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडा प्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी दिली आहे.
निवड झालेले खेळाडू व त्यांची महाविद्यालये पुढीलप्रमाणे -
 
 
निखिल दिक्षित: स प महाविद्यालय
 
रणवीर मोहिते: बीएमसीसी महाविद्यालय
 
संजाना जोईल: मॉडर्न एज्युकेशन सोसायटी
 
श्रेया आणेकर: कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज
 
ऋजुता देसाई: ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेज, पिसोळी
 
 
ही स्पर्धा ब्राझील देशातील आराकजू या शहरात १२ ते १८ सप्टेंबर २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी आठ स्पर्धकांमधील सहा स्पर्धक हे विद्यापीठाचे खेळाडू आहेत. विद्यापीठाच्या वतीने सहा खेळाडूंना निवड चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@