अंगारकी संकष्टी चतुर्थी निमीत्ताने भाविकांची रीघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |


 

टिटवाळा :- टिटवाळ्यातील महागणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अंगारक संकष्ठी चतुर्थी निमीत्ताने लाखो भाविक भक्तांनी रीघ सकाळपासून पाह्याला मिळाली .गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया...असा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावली .

रात्री पासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी दर्शन मंडपात रांगा लावल्या होत्या. बाप्पाला महाअभिषेक घातल्यावर महाआरती नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. ही वर्षातील शेवटची अंगारक संकष्ट असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली . पुष्प व पुजा साहित्य विक्रेत्यांकडूनदेखील गर्दीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले. सांगण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन कडून ८ अधिकारी, ५० कर्मचारी व १५ ट्रेकिंग फोर्स कर्मचारी असा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मंदिर व्यवस्थापना कडून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले होते. अनिरुद्ध बापूंचे कारसेवक व इतर सामाजिक संस्थांची मंडळी आपली कर्तव्य बजावतांना दिसत होती. तसेच राजकिय, सामाजिक संस्था व मंडळांकडून येणार्‍या जाणार्‍या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, नास्ता, फराळ व सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरा पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती गणपती मंदिर विश्वस्तांकडून देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@