कायम स्वरुपी टिकेल असे आरक्षण मराठा समजाला देण्याचा आमचा प्रयत्न : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

 
 
 
मुंबई :  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यसरकार कार्यरत आहे. कायम स्वरुपी चिकावं असं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा आमचा मानस आहे, त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या 'छत्रपती राजाराम महाराज' यांचे विचार या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
राज्यातील अनुसुचित जाती - जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता. न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारने पहिल्यांदा आरक्षणाचा कायदा केला. पण काही याचिका न्यायालयात आल्यानंतर न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मात्र अजूनही मराठा समाजाला सर्व पातळ्यांवर वैध ठरेल असेच आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात सध्या ५२ टक्के आरक्षण आहे. आरक्षणाची टक्केवारी वाढवायची असेल, तर मागास आयोगाचा अहवाल येणे गरजेचे आहे. त्यानंतरच न्यायालयात आरक्षण वैध ठरू शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
भावनेच्या भरात निर्णय न घेत संपूर्ण विचार करुन निर्णय घ्यावा लागेल :

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नाही, त्यासाठी संपूर्ण विचार करुन योग्य त्या मार्गाने निर्णय घ्यावा लागेल, कायद्याच्या चौकटीत बसणारेच आरक्षण द्यावे लागणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. काही नेते मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी करत आहेत. पण अध्यादेशावर आरक्षण टिकणार नाही. ज्यांना या कायदेशीर बाबींबद्दल माहिती आहे. ते याबाबत काही बोलायला तयार नाहीत. कारण ते सध्या दडपणाखाली आहेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
@@AUTHORINFO_V1@@