गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा बसेस - दिवाकर रावते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
१ ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर ९  ऑगस्टपासून संगणकीय आरक्षण सुविधा
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २ हजार २२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
 
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे.
 

संगणकीय आरक्षण सुविधा ९  ऑगस्ट पासून
 
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २ हजार २२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या ९ ऑगस्ट ( एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.
 
१  ऑगस्ट पासून ग्रुप बुकिंगला सुरुवात
 
 
तसेच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा.
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. ८  सप्टेंबर २०१८  ते दि. १२  सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८  ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक' (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@