२०१९ च्या निवडणुक तयारीला लागा - विष्णू सवरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

वाडा: भारतीय जनता पार्टी वाडा मंडळाची विशेष बैठक सोमवारी वाडा येथील वसंत स्मृती हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत २०१९ च्या निवडणुक तायारीला लागण्याची सुचना कार्यकत्यांना यावेळी राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी दिल्या. जवानांना मानवंदना, शेतक-यांचा सन्मान, मंडळांच्या व्यापक बैठका , मतदार नोंदणी आदी विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

 

यावेळी प्रदेश कमिटी सदस्य व पालघर लोकसभा विस्तारक बाबाजी काठोले, ठाणे-पालघर विभागीय सरचिटणीस योगेशजी पाटील, जिल्हा सरचिटणीस व तालुका निरीक्षक नंकुमार पाटील, चिटणीस डॉ.हेमंत सवरा, तालुका अध्यक्ष संदीप पवार, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजुजी दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि. प. महिला बालकल्याण सभापती व तालुका महिला आघाडी अध्यक्ष धनश्री चौधरी, वाडा पं. स. सभापती अश्विनी शेळके, सरचिटणीस मंगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्तविक मंडळ संदीप पवार यांनी तर सूत्रसंचालन मंडळ सरचिटणीस प्रभाकर पाटील यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@