सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे - उद्योजक प्रेम कोगटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 
 
श्रीमंत असो वा गरीब...सर्वांचे जीवनमान सुसह्य व्हावे, अशा पद्धतीने जळगाव शहराचा विकास व्हायला हवा. किमान खड्डेमुक्त रस्ते, सुरळीत वीज पुरवठा आणि पुरेसे पाणी मिळावे, अशी अपेक्षा प्रख्यात उद्योजक, दाल परिवाराचे सर्वेसर्वा तसेच रोटरी प्रांत ३०३० चे माजी प्रांतपाल प्रेम कोगटा यांनी ‘तरुण भारत’ने साधलेल्या संवादात व्यक्त केली.
 
अनेक चांगले नेते लाभले, पण हवी तशी भरभराट झाली नाही, जीवनमान काहीसे सुसह्य असलेल्या या शहराची व्यापार, उद्योग आणि शैक्षणिक सुविधांमुळे झपाट्याने वाढ झाली. पण सध्या रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण होणे दूरच पण त्यातील कमतरतांमुळे खूप त्रास जाणवतोय. वाहतुकीची समस्या, सिग्नल यंत्रणा, अपूर्ण पडणारे चौक, पुरेशा वाहनतळाचा अभाव, उद्यानांचा अभाव, वाढता कचरा, दुर्गंधी, सांडपाण्याचा निचरा नीट न होणे, त्यांची नियमित, व्यवस्थित सफाई न होणे...या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम अपघात आणि प्राण व वित्तहानी वाढण्यात आणि शहरवासियांचे स्थलांतर वाढण्यात होत आहे.
 
 

 
 
कर भरपूर पण सुविधा नाहीत. मग उद्योग येतील कसे?.. जनतेचे कोट्यवधी रुपये पगारावर, सेवांवर, स्वच्छतेवर खर्च होत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आंतरिक तळमळ व स्वच्छ हात आणि मनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासाठी इंदूर शहराचे उदाहरण पुरेसे मार्गदर्शक ठरावे. उद्योग, उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घ्यायला हवे, सुदैवाने तशी जळगावात दानत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत प्राधान्याने, जबर इच्छाशक्तीने जास्तीत जास्त निधी मिळवूनही दर्जेदार कामे केली तर काहीही अवघड नाही. तरच प्रचंड गुंतवणुकीचे मोठमोठे उद्योग जळगावात येऊ शकतील. अन्यथा नागरिकांच्या सोशिकतेचा अंत होवून असंतोषाचा उद्रेकही होऊ शकतो, असे वाटते.
 
@@AUTHORINFO_V1@@