महामार्गाला समांतर रस्ते, भुयारी मार्ग व्हावेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

प्राणहानी टळणार कधी ? डॉ.चंद्रशेखर सिकची

 

 
 
रस्ता दुर्घटना आणि अपघातांमध्ये हकनाक जे प्राण जातात, ते वाचवण्यासाठी प्राधान्याने महानगरातून जाणार्‍या व परिसराला जोडणार्‍या महामार्गालगत समांतर रस्ते आणि आवश्यक तेथे सबवे (भुयारी मार्ग) काहीही सबबी न सांगता केले जावेत. तसेच शहरातील मुख्य मार्गावर शक्य तेथे रस्ता दुभाजक केले जावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी व्यक्त केली आहे.
 
डॉ. सिकची हे खान्देशातील पहिले बालरोगतज्ज्ञ मानले जातात. १९७१ पासून त्यांची सातत्याने रुग्णसेवा सुरू आहे. अनेक सामाजिक चळवळीत, विशेषत: रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे अनेक वर्ष पदाधिकारी, सर्वोच्चपदी (प्रांतपाल) राहिलेले आहेत. अनेक परदेशांमध्ये प्रवासही त्यांनी केलेला आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तरुण भारत’ने साधलेल्या सुसंवादात त्यांनी दरवर्षी सुमारे ४०० जणांचा बळी घेणार्‍या आणि अनेक कुटुंबांना कायम दु:खी करणार्‍या अपघातांबाबत आपले हे मत प्रदर्शित केले.
 
 
 
 
अनेक परिवारांमधील लहान मोठ्यांची प्रकृती, विशेषत: बालकांच्या आरोग्याची अवस्था पाहता शुद्ध पाणी पुरविले जावे, शहरातील शासकीय, निमशासकीय आरोग्य सुविधांमध्ये पारदर्शकता, मानवी चेहरा निर्माण केला जावा.शहर सांडपाणी-कचरामुक्त व्हावे, जीवघेण्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी रस्त्यावर कचरा, गटारी तुंबलेल्या सांडपाणी, कचरामुक्त जळगाव ही संकल्पना राबवली जावी. भुयारी गटारींचे निर्माण आणि पर्यावरण संतुलनासाठी मुख्य व उपमार्गावर आरोग्यप्रद सुंदर वृक्ष संवर्धन व्हायला हवे. (काही भरीव केले तर सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीही पुढे येतील) चांगले, खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी, न तुंबणार्‍या गटारी, संपूर्ण स्वच्छता या सर्व थरातील जनतेच्या आवश्यक प्राथमिक गरजा प्राधान्याने पूर्ण व्हाव्यात, याबाबत सर्वच पक्षीयांनी कर्तव्यभान राखावे. औद्योगिक वसाहतीतील लहान मोठे उद्योग सुस्थितीत चालले, वाढले पाहिजेत. त्यासाठी लागणार्‍या मूलभूत, प्राथमिक सुविधांची उपलब्धता मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय आणि सन्मानपूर्वक करून दिली पाहिजे, अशी रास्त अपेक्षाही डॉ. सिकची यांनी या सुसंवादात व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@