तरुणांनो आत्महत्या करु नका : सुप्रिया सुळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई :  मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. आणि त्यामुळे राज्यातील आतापर्यंत दोन तरुणांनी आत्महत्या करत आपला प्राणत्याग केला आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी "तरुणांनो आत्महत्या करु नका" अशी कळकळीची विनंती राज्यातील तरुणांना केली आहे.
 
 
 
 
"मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमधील प्रमोद होरे-पाटील या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना अतिशय दुःखद आहे. प्रमोद यांना श्रद्धांजली !" असे म्हणत त्यांनी या तरुणाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मराठा समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुख्यमंत्र्यांनी लवकरच पावले उचलली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या आहेत. 
 
 
 
 
"मराठा मोर्च्याच्या" लढवय्यांनो आपण आपला हक्क मिळवूच पण त्यासाठी कृपया, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका." असे देखील त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान या विषयावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावली असून मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@