मुरबाड तालुक्यातील ५० गावांचा सुभाष पवार यांचा दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आतापर्यंत ५० गावांचा दौरा पूर्ण केला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्ह्यातील ग्रामस्थांबरोबर संपर्क वाढविला आहे. आतापर्यंत मुरबाड तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ५० हून अधीक गाव व पाड्यांची पाहणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील देहरी, तळेखल, खुटारवाडी, खोपिवली, मिल्हे, वडाचीवाडी, खपाचीवाडी, पाडाळे, गणेशपूर, दुधनोली, बेंढारवाडी, उमरोली, जायगाव, महाज, खेवारे आदी गावांना भेट देण्यात आली. तसेच तेथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रश्नांबाबत लगेचच अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला. तर राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या दौऱ्यात ग्रामस्थांना किमान सुविधा मिळतात का, यावर उपाध्यक्ष पवार यांनी भर दिला. त्याचबरोबर गावातील अंगणवाडी, स्मशानभुमी, जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत, आरोग्यसुविधा, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदींची पाहणी केली.
 

या दौऱ्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार, पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, प्रकाश सुरोशे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, चंद्रकांत बोस्टे, विठ्ठल म्हाडसे, सुभाष भोईर आदी उपस्थित होते. दरम्यान, वन विभागातर्फे गॅस सिलिंडर देण्यात न आल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडे केली. त्यावेळी लगेचच सुभाष पवार यांनी वन विभागाच्या टोकावडे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले.

@@AUTHORINFO_V1@@