पार्लेकरांच्या महिला सक्षमीकरणासाठी पहिले पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

मुंबई - विलेपार्लेतील महिला उद्योजिकांनी एकत्र येऊन आपल्या विभागात राहणार्‍या उद्योजकीय महिलांची ओळख व्हावी यासाठी विले पार्ले वुमन नेटवर्कींग मीटचे आयोजन करण्यात आले होते. पार्ले इंटरनॅशनल हॉटेल मध्ये ही उद्योजकीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस विविध क्षेत्रातील महिला उद्योजिका उपस्थित होत्या.
 

यावेळी प्रांजल पुष्कर श्रोत्री यांनी स्वतःच्या उद्योगाची माहिती देत सर्व महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले. डॉ.अस्मिता सावे यांनी ज्वलंत विषय असलेल्या प्लास्टिकच्या मुद्द्यावर महिला उद्योजिकांना मार्गदर्शन केले. दी ग्रॅनी वे ही संस्था कापडी पिशव्यांचे वाटप करते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमासाठी त्यांचे कौतुक केले.

 

महिलांना सासर आणि माहेर या दोन्ही स्तरांवर मेहनत घ्यावी लागते. त्यात जर ती महिला उद्योग करत असेल तर तिच्या समोरील आव्हाने अनेक असतात. नुकताच उद्योग सुरु केलेल्या महिला आणि प्रस्थापित उद्योजिका यांची भेट घडविणे, त्यांच्यात सेतू निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजक रसिका जोशी-फेने यांनी सांगितले. विशेष म्हणजे महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन देखील महिलांनीच केले होते हे विशेष. या कार्यक्रमात ४० हून अधिक महिला उद्योजिका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महत्वाचा सहभाग जुई बाग, मानसी थिटे, शिल्पा कुलकर्णी या उद्योजिकांचा होता.

@@AUTHORINFO_V1@@