हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
लंडन : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने अमेरिकेला १-१ अशा समान गोलवर रेटून धरले असून यामुळे भारताने आता प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. भारताने या विश्वचषक सामन्यांमध्ये आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत ही कामगिरी केली आहे. मात्र अमेरिकेला शेवटच्या ग्रुपमध्ये समान गोलवर अडवून आता अमेरिका आणि भारत यांच्यात पुन्हा एकदा या अंतिम ग्रुपसाठी सामना खेळला जाणार आहे. 
 

प्लेऑफ म्हणजे नेमकं काय? 
 
 
एखाद्या अंतिम खेळात जर विरोधी दोन्ही संघ खेळाच्या शेवटच्या वेळात एकाच गोल संख्येवर असले तर या दोन्ही संघांना प्लेऑफ खेळायला मिळत असते. यामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यासाठी खेळत असतात आणि आता जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करत असतो. यालाच सोप्या भाषेत सांगायचे तर दोन्ही संघ एकाच गोल संख्येवर असेल तर पुन्हा एकदा सामना त्यांच्यात खेळवला जात असतो. 
 
@@AUTHORINFO_V1@@