जात, प्रलोभन नव्हे... कार्यक्षमता विचारात घ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

अॅड. सुशील अत्रे यांचे मतदारांना खडे बोल

 
 
 
 
मतदारांनी जातपात आणि पैसा या अन्य प्रलोभनांना बळी न पडता, त्याच्या पलीकडे जात विचार करून मतदान करावे, उमेदवारांचे चारित्र्य, त्याचे काम (क्षमता, अभ्यास, सेवाभाव) पाहून मतदान करावे, अशी वेगळी अपेक्षा प्रसिद्ध कायदेपंडित आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तरुण भारत’ ने साधलेल्या सुसंवादात व्यक्त केली.
 
सर्वांना सुख समाधानाने जीवन जगता यावे, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, रस्ते नीटनेटके असावेत, खड्डे नसावेत, वीजपुरवठा सुरळीत असावा, एवढीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. पण या जनतेचा समावेश असलेला मतदार आपल्या वैयक्तिक व संकुचित स्वार्थाचा विचार करीत असल्याने तोच आजच्या दूरवस्थेला जबाबदार ठरत आहे. माझ्या मनपा आणि सत्तारुढ मंडळीकडून नव्हे तर मतदारांकडूनच जास्त अपेक्षा आहेत, असा काहीसा वेगळा व धक्कादायक वाटणारा विचारही त्यांनी मांडला.
 
 
 
 
अॅड. सुशील अत्रे हे बालपणापासून उत्तम वाचक, विविध सामाजिक, राष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक तसेच वक्ते, वादविवादपटू तसेच रंगभूमीवर अभिनय, नाटककार अशा कलाक्षेत्रात कार्यरत आणि पर्यटन आणि विविधांगी लेखनात रमलेले बहुधांगी व्यक्तिमत्त्व आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या आंदोलनात (१९९०) त्यांनी करसेवेत सहभाग घेतला होता, तेव्हा त्यांना ललितपूरच्या कारागृहात १० दिवस राहावे लागले होते.
 
अॅड. सुशील अत्रे म्हणाले की, मनपा पातळीवर पक्षीय भूमिकेतून मतदान होऊ नये, स्थानिक मुद्यांवर मतदान व्हावे. ‘लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार सरकार, मिळत असते’, या इंग्रजी म्हणीच्या भावार्थानुसार मतदारांनीच आपली दृष्टी, विचारसरणी बदलायला हवी, आपोआपच चांगले नगरसेवक लाभतील. आर्थिक व अन्य मोबदल्याची अपेक्षा करणार्‍यांना सुशासन कसे मिळणार?...
 
@@AUTHORINFO_V1@@