पाक दहशतवादाचे माहेरघर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |






संयुक्‍त राष्ट्र : संपूर्ण दक्षिण आशियात पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी माहेरघर आहे. थेट युद्धातून काश्मीर मिळवता येत नसल्यानेच हा देश आता दहशतवादाचा वापर करीत आहे. काश्मीरबाबत अपप्रचार पसरविणे, हा पाकचा जुनाच छंद आहे, त्यांचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत,” असा जोरदार हल्‍ला भारताने संयुक्‍त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर चढविला.

 

‘राईट टू रिप्लाय’ अंतर्गत पाकने सोमवारी संयुक्‍त राष्ट्रात काश्मीरचे तुणतुणे वाजविल्यानंतर भारताने पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले. विविध मानवी हक्‍क आयोगांच्या प्रतिनिधींना, काश्मिरात मानवी हक्‍काचे प्रचंड उल्‍लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भारताने आमच्यावर कितीही आरोप केले, तरी सत्यता बदलणार नाही, असे पाकने म्हटले होते. पाकच्या या आरोपांचा संयुक्‍त राष्ट्रसंघातील भारतीय दूतावासाचे सचिव संदीपकुमार यांनी खरपूस समाचार घेतला. ‘राईट टू रिप्लाय’चा वापर करून ते म्हणाले की, “संपूर्ण दक्षिण आशियातील दहशतवाद्यांचे माहेरघर असलेल्या पाकने नेहमीच काश्मीरबाबत अपप्रचार केला आहे. पण, यात हा देश आधीही कधीच यशस्वी ठरला नाही आणि भविष्यातही त्यांना यश येणार नाही. भारताला काश्मीर मुद्द्यावर सफाई देण्याची मुळीच गरज नाही आणि पाकसोबत यावर चर्चाही करायची नाही. जम्मू-काश्मीर हे भारतातच होते, आहे आणि नेहमीच राहणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@