शुक्रवारपासून मान्सून पुन्हा एकदा होणार सक्रीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |


पुणे : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून येत्या शुक्रवारपासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर सक्रीय होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि मुंबई महानगराच्या भागात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ यासर्व ठिकाणी मान्सून सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनमध्ये खंड पडला होता. परंतु तरी देखील अधूनमधून पाऊसाची रिपरिप सुरु होती. पण येत्या शुक्रवारपासून सर्व ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असे वेधशाळेने सांगितले आहे.

दरम्यान कालपासून मुंबई महानगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये संपूर्ण भारतामध्ये मेघालयातील चेरापुंजीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात होईल.
@@AUTHORINFO_V1@@