पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार मतदारसंघाची मागणी-भडगाव येथे महाराष्ट्र पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |
 
 
 


 


पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार मतदारसंघाची मागणी
-भडगाव येथे महाराष्ट्र पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

 
भडगाव, ३ जुलै
ज्याप्रमाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांचे राखीव मतदार संघ आहेत. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर मतदारसंघ आहेत, त्याच धर्तीवर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांचाही स्वतंत्र मतदार संघ असलाच पाहिजे, अशी महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने आग्रही मागणी करण्यात येत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करतोच शिवाय त्यांच्याही अनेक प्रलंबित व न्याय मागण्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही निर्माण होण्यासाठी आणि पत्रकारांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा. यासाठीच पत्रकारांचा स्वतंत्र मतदारसंघ व्हावा, यासाठी येणार्‍या जुलै २०१८ पासून सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करावा, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन आमदार किशोर पाटील, तहसिलदार सी.एम. वाघ यांना देण्यात आले.
 
 
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते विधानसभा, विधानपरिषद, अध्यक्ष, सभापती विधानसभा व विधानपरिषद, खासदार, जळगाव व जिल्हाधिकारी यांना मेल, फॅक्स करण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष अशोक परदेशी, तालुका कार्याध्यक्ष सागर महाजन, तालुका उपाध्यक्ष शेख जावेद, तालुका सचिव धनराज पाटील, जिल्हा सल्लागार सुनील कासार, संजय पवार, विठ्ठल पाटील, तालुका सल्लागार राजु शेख, माजी सचिव सुनील पाटील, लिलाधर पाटील, सम्राटआण्णा महाजन, नरेंद्र पाटील, संजय पाटील, निंबाजी पाटील, भास्कर शार्दुल, अस्लम मिर्झा सह सर्व पत्रकारांची सही होती.
 
 
पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पत्रकार मतदार संघ व्हावा असे निवेदन आपआपल्या तालुक्यातील खासदार, आमदार व तहसीलदार यांना जिल्ह्यातील ईतर पत्रकारांनिही संघटनेचे गट तट विसरून निवेदन देण्याचे अवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@